रेपो रेट 'जैसे थे',आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा, रेपो रेट 'जैसे थे',आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा
RBI Repo Rate Update : देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. महागाई हळूहळू कमी होऊ लागल्याने आरबीआयने रेपो दर 'जैसे थे' ठेवले आहेत. तसेच आगामी काळात व्याजदर कमी होतील, अशी आसही कजदारांच्या मनात असेल. त्यामुळे जर व्याज कमी होईल असे वाटत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कर्जदारांना दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल केला नसून रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. तसेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
मात्र, आरबीआयने सलग दुसऱ्यांदा धोरणात्मक व्याजदरात बदल केला नसला तरी, चलनवाढीवर केंद्रीय बँकेचे प्राधान्य पाहता चालू आर्थिक वर्षात रेपो दरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, डिसेंबरपर्यंत चलनविषयक आढाव्यापर्यंत रेपो दर ६.५% वर स्थिर ठेवण्याची प्रक्रिया सुरू राहील, अशी सर्व तज्ज्ञांची अपेक्षा आहे. फेब्रुवारी २०२४ च्या आढावा बैठकीत रेपो दरात पहिली कपात होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
एचडीएफसी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरुआ म्हणाले, "आरबीआयचे गव्हर्नर वाढीबाबत उत्साही असताना आणि चलनवाढीचा कमी होणारा दबाव समजून घेत असताना ते महागाईच्या भविष्याबद्दल अधिक सावध आहेत." याशिवाय क्रिसिल रेटिंग्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ती जोशी यांनी देखील सांगितले की आरबीआय चालू आर्थिक वर्षात दरांवर यथास्थिती कायम ठेवेल आणि २०२४ च्या मार्च तिमाहीतच कपात सुरू करेल.
प्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI आधारित किरकोळ चलनवाढीचा दर १८ महिन्यांच्या नीचांकी ४.७% पर्यंत घसरल्यानंतर एमपीसीची बैठक पार पडली. CPI चा मे महिन्यातील आकडा एप्रिलच्या तुलनेत कमी होऊ शकतो, असे आरबीआय गव्हर्नरने नुकतेच संकेत दिले. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले होते की आरबीआय व्याजदर विराम लावण्याची आणि पॉलिसी रेट रेपो ६.५% वर ठेवण्याची शक्यता जास्त आहे. या बैठकीतही तेच झाले. मे महिन्याची सीपीआय १२ जून रोजी जाहीर होईल.
व्याजदर वाढीचा वाईट परिणाम
गेल्या वर्षी मे २०२२ पासून आरबीआयने रेपो दर सातत्याने वाढवल्यामुळे बँकांनी त्यांच्या कर्ज दर आणि बेंचमार्क कर्जदरातही वाढ केली, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या ईएमआयवर झाला. दुसरीकडे, रेपो दरातील स्थिरता कर्जदारांसाठी नक्कीच चांगली बातमी असून त्यांना मद्य व्याजदराच्या ओझ्यातून दिलासा मिळाला आहे. लक्षात घ्या की व्याजदर तुमच्या हातात नसला तरी जर तुमच्या कर्जावरील EMI वाढत असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा कार्यकाळ वाढवण्याची चूक करू नये. त्याऐवजी, अधिक EMI भरा कारण तुम्हाला कर्जावर अधिक व्याज द्यावे लागेल.